शिवसेनेसोबत सरकार चालवायचं झाल्यास ते धर्मनिरपेक्ष पद्धतीने चालेल- शरद पवार

0
202

नागपूर: काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे सेक्युलर पक्ष आहेत. शिवसेनेसोबत सरकार चालवायचं झाल्यास ते धर्मनिरपेक्ष पद्धतीने चालेल यासाठी आग्रह धरु असे वक्तव्य शरद पवार यांनी केलं.

शिवसेना हिंदुत्ववादी विचारसरणीचा पक्ष आहे. पण सरकार चालवताना शिवसेनेनंही सेक्युलर व्हावं, असा आमचा आग्रह असेल असं मत शरद पवारांनी व्यक्त केलं आहे, ते शुक्रवारी नागपूर येथील पत्रकारपरिषदेत बोलत होते.

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात सत्तास्थापनेसाठी वाटाघाटी सुरु आहेत. शिवसेना आणि काँग्रेसच्या विचासरणीत फरक असल्यामुळे सत्तास्थापनेसाठी अणखील वेळ लागत असल्याचं सांगितलं जात आहे.

दरम्यान, हिंदुत्त्वाचा पुरस्कार करणारी शिवसेना यावर काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here