मुंबई : कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना समन्स बजावण्यात आलं असून 4 एप्रिल रोजी आयोगासमोर हजर राहण्याचा आदेश देण्यात आला आहे.
पुण्यातील भीमा कोरेगाव येथे 2018 रोजी झालेल्या हिंसाचाराची कारणं आयोगाकडून तपासली जात असून त्याच पार्श्वभूमीवर हे समन्स बजावण्यात आलं आहे. यावेळी शरद पवारांची साक्ष नोंदवली जाणार आहे.
कोरेगाव भीमा प्रकरणाची चौकशी करत असलेल्या आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती जे. एन. पटेल यांनी याआधी शरद पवारांची साक्ष नोंदवली जाणार असल्याचं सांगितलं होतं. शरद पवार यांनी एल्गार परिषद प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यात त्यांनी कोरेगाव भीमाबद्दल काही माहिती दिली होती. त्यानंतर पवारांची साक्ष नोंदवण्याची मागणी आयोगाकडे करण्यात आली होती.
महत्वाच्या घडामोडी-
…तर आम्हाला कठोर पावले उचलावी लागतील; मुख्यमंत्र्यांचा मुंबईकरांना इशारा
करोनाची लागण झालेले रुग्ण आरोपी नाहीत, त्यांची नावं जाहीर करा; मनसेची मागणी
“…तेव्हाच आशेचा एक किरण ही आपल्या आयुष्यात येतो”
संसर्ग रोखण्यासाठी पंकजा मुंडेंचा राज्य सरकारला ‘हा’ मोलाचा सल्ला