Home पुणे “जनतेसाठी जो झटतो, त्याला लोक कधीही विसरत नाहीत”

“जनतेसाठी जो झटतो, त्याला लोक कधीही विसरत नाहीत”

पुणे : जनतेसाठी जो झटतो, त्याला लोक कधीही विसरत नाहीत. त्यामुळे शेवटच्या माणसापर्यंत बांधिलकी ठेवा, असा कानमंत्र राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला.

शरद पवार यांच्या हस्ते वारजे येथे 45 मीटर उंचीच्या राष्ट्रध्वजाचं अनावरण करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते.

तरुणांनी 45 मीटर उंचीचा राष्ट्रध्वज फडकवण्याचं चांगलं काम केलं आहे. राष्ट्रध्वज प्रत्येक देशाच्या अभिमानाचं प्रतिक असतं. आपला तिरंगा प्रत्येक भारतीयांच्या अभिमानाचं प्रतिक आहे, असं शरद पावर यांनी  म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

झाडावरील पानही पडले तरी पान का पडले म्हणून भाजप आंदोलन करु शकताे- जयंत पाटील

…पण नेहमी पळवाट काढणं बरं नव्हे; निलेश राणेंचा अजित पवारांना टोला

अण्णा हजारे यांचं मन वळवण्यात देवेंद्र फडणवीसांना अपयश; अण्णा उपोषणावर ठाम

आता भाजप का गप्प आहे?, राष्ट्रीय सुरक्षा इतकी स्वस्त का?; संजय राऊतांचा सवाल