“शरद पवारांनी पंतप्रधानांऐवजी एखादं पत्र मुख्यमंत्र्यांनाही लिहावं”

0
167

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांना पत्र लिहित मदतीचा हात मागितला होता. यावरून विरोधा पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.

शरद पवार हे पंतप्रधानांना मदतीसाठी पत्र लिहितात. त्यांनी एखादं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही लिहावं. कशा प्रकारे त्यांनी गरीबांना मदत केली पाहिजे. तसंच दुकानदारांना, फुटपाथवर बसणाऱ्यांना, छोट्या उद्योगांना कशाप्रकारे मदत केली पाहिजे याविषयी त्यांनी राज्य सरकारला पत्र लिहावं, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दरम्यान, राज्य सरकारकडून कोणत्याही उपाययोजना होत नाहीत. त्यांच्याकडून केवळ राजकारण सुरु आहे, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.

महत्वाच्या घडामोडी-

…तर मग हा देश ड्रामा करणाऱ्यांचा आहे; जितेंद्र आव्हडांच निर्मला सीतारमन यांच्यावर टीकास्त्र

काश्मीर आमचं आहे, होतं आणि आमचंच राहणार; आफ्रिदीला शिखर धवनचं सडेतोड उत्तर

लोकांमध्ये जाण्याची जी माझी सवय होती त्याचे परिणाम मला भोगावे लागले- जितेंद्र आव्हाड

हे सरकार आघाडीचं आहे की वाधवान सरकार?; देवेंद्र फडणवीसांचा सवाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here