मुंबई : आजच्या काँग्रेस ही उत्तर प्रदेशातील हवेली मोडकळीस आलेल्या जमीनदारांसारखी झाली आहे. त्यांच्याकडील जमीन गेल्या आता फक्त हवेली उरली आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका मुलाखतीत व्यक्त केलं होतं. यावरून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी शरद पवारांना आवाहन केलं होतं.
काँग्रेस पक्षाच्या विचाराचे जे आहेत आणि राज्यघटनेच्या मुलभूत तत्वांशी जे बांधील आहेत, त्यांनी सरळ काँग्रेस पक्षाच्या झेंड्याखाली यावं, असं आवाहन बाळासाहेब थोरात यांनी शरद पवारांना यावेळी केलं. यावरून आता काँग्रेस नेते तसेच राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया देत थोरातांच्या वक्तव्याचं समर्थन केलं.
भाजपविरोधात मोट बांधण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे. राष्ट्रवादी तर मूळ काँग्रेसच्या विचारधारेतूनच निर्माण झालेला पक्ष आहे. आपापसातील मतभेद दूर करून आपण पुन्हा एकत्रित आले पाहिजे. राष्ट्रवादीने काँग्रेसमध्ये विलीन होण्याची बाळासाहेबांनी जी भूमिका मांडली ती योग्य आहे. पवारांनी काँग्रेसमध्ये येऊन शक्ती वाढवावी, असं वडेट्टीवार म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
मी भाजपची पैशांची ऑफर न घेता पक्षात आलोय; ‘या’ भाजप आमदाराचा खुलासा
“सांगलीत उद्या कृष्णा नदीची पाणी पातळी 25 ते 27 फुटांपर्यंत जाण्याची शक्यता”
“साताऱ्यात शशिकांत शिंदेंचा शिवेंद्रराजे भोसलेंना मोठा धक्का; अनेक समर्थकांचा राष्ट्रवादीत प्रवेश”
उत्तरप्रदेश निवडणूकीत ‘आप’ सर्व जागा लढवणार