आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
ठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची परवा दिवशी ठाणे येथे भव्य सभा भरवण्यात आली. या सभेत जोरदार टोलेबाजी करत राज ठाकरेंनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता.
शरद पवारांनी जातीपातीचं राजकारण केलं. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना टार्गेट करण्यात आलं, असा आरोप राज ठाकरे यांनी केला. त्यावरून शरद पवारांनी राज यांना प्रत्युत्तर दिलं. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवछत्रपतींचा उल्लेख करताना त्यांचे व्यक्तिमत्व घडवण्यात जिजाऊंपेक्षा दादोजी कोंडदेव यांचे योगदान जास्त होतं, असं शरद पवार म्हणाले होते. यावरून आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हे ही वाचा : “उद्या ठाकरे सरकारमधील आणखी एक घोटाळा बाहेर काढणारच; रिचेबल झाल्यानंतर सोमय्या उद्या बाॅम्ब फोडणार?”
देशपांडे यांनी याबाबत बाबासाहेब पुरंदेर यांनी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीला प्रेसला लिहिलेलं एख पत्र समोर आणत शरद पवारांनी महाराष्ट्राची माफी मागावी, अशी आक्रमक मागणी देशपांडे यांनी यावेळी केली.
पुरंदरे यांच्या या पत्रात, ज्यांच्यावर कोट्यवधी भारतीयांचं प्रेम आहे, त्यांच्याबद्दलचे आम्ही निराधार आरोप आम्ही सहन करणार नाही. जेम्स लेन यांनी त्यांच्या पुस्तकात हेच केलं आहे. शिवाजी महाराज आणि दादोजी कोंडदेव यांच्याविषयी जेम्स लेन यांनी जे विधान केलं आहे, ते अतिशय घाणेरड्या मनोवृत्तीची उपमा आहे. त्यामुळे प्रकाशक आणि लेखकांनी 25 नोव्हेंबर 2003 पर्यंत कोट्यवधी भारतीयांच्या भावना दुखावल्याबद्दल माफी मागावी, आणि हे पुस्तक भारत आणि परदेशातूनही मागं घ्यावं. तर प्रकाशक आणि लेखकानं असं केलं नाही, तर भारत सरकारनं या पुस्तकावर बंदी घालावी आणि त्यांच्याविरोधात योग्य ती कारवाई करावी, अशी विनंती आम्ही करू, असं देशपांडे म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
“मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंच्या भोंग्याच्या निर्णयावरून ‘या’ नाराज नेत्याने दिला राजीनामा”
“देवेंद्र फडणवीसजी आयुष्यभर हेच करणार आहात का?”; राष्ट्रवादीचा सवाल
आदित्य ठाकरेंनी मनसेला पुन्हा डिवचलं; म्हणाले…