मुंबई : राजकीय संघर्ष आपण नेहमी करत असतो. त्यात चुकीचं काही नाही. लोकशाहीमध्ये हे सुरु असतं. पण सध्या आपल्या देशावर संकट आहे. संकटाच्या काळात राजकारण नको, करोनाचा पराभव करणे हाच सर्वांचा एककलमी कार्यक्रम असला पाहिजे, अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांना केली.
वांद्रे रेल्वे स्टेशनवर काल जे घडलं, ते पुन्हा घडता कामा नये. यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे, असं शरद पवार म्हणाले. त्यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला.
दरम्यान, वांद्रयातून रेल्वे सुटणार असं सांगण्यात आल्यामुळे लोक मोठया संख्येने तिथे जमले होते. पुन्हा अशा गोष्टी घडू नयेत यासाठी आपण खबरदारी घेतली पाहिजे, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
“महाराष्ट्र सरकार गांभीर्याने आणि धैर्याने करोनाचा सामना करतंय”
उद्धव ठाकरेंनी मानले भिम सैनिकांचे आभार; म्हणाले…
अमित शाह यांचा उद्धव ठाकरेंना फोन; म्हणाले…
मी रणांगणात उतरलो तर महागात पडेल; चंद्रकांत पाटलांचा पलटवार