“शरद पवार आमदार निलेश लंकेंच्या घरी, लंके कुटुंब भारावलं”

0
319

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे शनिवारी नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत विविध विकासकामांचं उद्घाटन झालं. या सोहळ्यानंतर शरद पवार थेट आमदार निलेश लंके यांच्या घरी गेले.

निलेश लंके हे नगर जिल्ह्याच्या पारनेर मतदारसंघाचे आमदार आहेत. शरद पवार आपल्या छोट्याशा घरी आल्यावर अख्खं लंके कुटुंब भारावून गेलं होतं. त्यानंतर आज निलेश लंके यांनी आपल्या भावना फेसबूक पोस्टद्वारे व्यक्त केल्या आहेत. त्यावेळी काही क्षण मंतरल्यासारखे होते, असं निलेश लंके म्हणालेत.

महत्वाच्या घडामोडी –

भाजपाच्या ‘या’ महिला आमदारांच्या पतीला जीवे मारण्याची धमकी

शिवसेनेला सोडताना बाळासाहेबांच्या आठवणीने साबणे यांना अश्रू अनावर; म्हणाले…

तारक मेहता का उल्टा चष्मातील नट्टू काका यांचं निधन

शरद पवारांना जर पंतप्रधान व्हायचं असेल, तर त्यांनी…; सुधीर मुनगंटीवार यांचा उपरोधक सल्ला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here