मुंबई : करोना व्हायरसचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी रविवारी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. त्यांना देशभरातून उत्तम प्रतिसाद मिळू लागला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही साथ दिली आहे. त्यांनी टि्वट करून जनतेला आवाहन केले आहे.
कोरोना व्हायरसच्या राष्ट्रीय संकटाशी सामना करण्यासाठी महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली युद्ध पुकारले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यू अर्थात घरीच राहण्याचे आवाहन केलं आहे. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्वांनी घरातच राहा, अशी विनंती शरद पवार यांनी केलं आहे.
कोरोना व्हायरसच्या राष्ट्रीय संकटाशी सामना करण्यासाठी महाराष्ट्रात मा. @CMOMaharashtra यांच्या नेतृत्वाखाली युद्ध पुकारले आहे. मा. @PMOIndia यांनी जनता कर्फ्यू अर्थात घरीच राहण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्वांनी घरातच राहावे ही विनंती.#Corona pic.twitter.com/8f5kZk23FB
— Sharad Pawar (@PawarSpeaks) March 21, 2020
महत्वाच्या घडामोडी-
जनता कर्फ्यूमध्ये वाढ केली जाऊ शकते- संजय राऊत
“फडणवीस यांनी वेगळ काय केलं असतं, करोना विषाणू गिळून त्यांनी ढेकर दिला असती का?”
शेकहँड टाळा, नमस्कार करा; शरद पवारांच जनतेला आवाहन
सकाळी पत्रकार परिषद घेतली म्हणजे मुख्यमंत्र्यांचं काम संपलं; निलेश राणेंची बोचरी टिका