“शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना”- गोपीचंद पडळकर

0
175

पंढरपूर : भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्रामक टीका केली आहे.

शरद पवार हे या महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे. कारण गेल्या अनेक वर्षापासून ते महाराष्ट्राचं नेतृत्त्व करतात. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची भूमिका त्यांची राहिलेली आहे. ही भूमिका यापुढेही ते कायम ठेवतील असंही गोपीचंद पडळकर म्हणाले.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस सरकारने धनगर समाजाला तरतूद केलेले एक हजार कोटी या महाविकास आघाडी सरकारने दिले नाहीत. शरद पवार हे नाशिकला अवकाळी झाल्यानंतर गेले, कोकणात वादळानंतर गेले, पण अद्याप त्यांना मदत मिळाली नाही. हा सगळा फार्स सुरु आहे, अशी घणाघाती टीका गोपीचंद पडळकर यांनी केली.

महत्वाच्या घडामोडी-

राज ठाकरेंसोबत जाण्याची आमची इच्छा होती पण…; देवेंद्र फडणवीसांच वक्तव्य

टेस्टिंग वाढवा, कोरोना लढ्यासाठी महापालिकांना मदत करा; फडणवीसांचं राज्य सरकारला आवाहन

शेतकऱ्यांना कर्ज न देणाऱ्या बँकांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार; राज्य सरकारचा इशारा

अशोक चव्हाण यांची हकालपट्टी करा; मराठा क्रांती ठोक मोर्चाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here