सांगली : परतीच्या पावसामुळं झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले आहेत. वयाच्या 79 व्या वर्षीसुद्धा शरद पवार नुकसानाची पाहणी करण्यासाठी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचत असल्यानं अनेकांनी शरद पवारांचं काैतुक केलं. यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवार यांना या वयात बांधावर उतरायला लागत आहे, हेच या महाआघाडीचं अपयश आहे. जे कारभारी त्यांनी या सरकारमध्ये बसवलेले आहेत, हे कारभारी सरळ सरळ अपयशी ठरले आहेत, त्यामुळे पवार साहेबांना बांधावर जाऊन पाहणी करावी लागते., असं म्हणत गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांवर टीका केली आहे.
दरम्यान, वयाची सत्तरी ओलांडल्यानंतरही एखाद्या तरुणालाही लाजवेल, अशा पद्धतीने शरद पवार आजही काम करत आहेत., असंही पडळकर यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
‘जनता चिंब भिजली, दिल्ली मात्र थिजली’; शरद पवारांच्या त्या सभेवरून राष्ट्रवादीने भाजपला डिवचलं
…आणि शिवसेना बॉलिवूड वाल्यांचे केस मोजत बसली आहे; निलेश राणेंची शिवसेनेवर टीका