आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : युक्रेन-रशियाच्या युद्धातून एक मोठी बातमी समोर आली आहेत. युक्रेनमध्ये गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. त्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.
यानंतर आता भारताने भारतानेही युक्रेनमधील विद्यार्थ्यांना मोठा अलर्ट दिला आहे. अशातच आता या विद्यार्थ्यांना वाचविण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे आता मैदानात उतरले आहेत. या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना फोन केला असल्याची माहिती राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.
हे ही वाचा : “मोठी बातमी! युक्रेनमध्ये गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू”
दरम्यान, फोनवरून शरद पवारांनी माहिती घेतली, तसेच महाराष्ट्रीयन आणि भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूप परत आणा, अशा सूचनाही दिल्या.
महत्वाच्या घडामोडी –
“शिवतीर्थवर नव्या पाहुण्याचं आगमन होणार, राज ठाकरे आजोबा होणार”
‘या’ निवडणूकीत शिवसेनेचा झेंडा फडकला, काँग्रेसला दिला पराभवाचा धक्का