मुंबई : केंद्र सरकारने ओबीसींच्या बाबतीत घटनादुरुस्ती करून राज्यांना अधिकार दिले पण आरक्षणाची मर्यादा 50 टक्के इतकीच अजून कायम असल्याने या घटनादुरुस्तीचा काहीही फायदा होणार नाही, असं राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी म्हटलं होतं. यावरुन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शरद पवारांवर टीका केली आहे.
पवार हे प्रगल्भ राजकीय नेते आहेत. या संबंधात सहमती कशी घडवता येईल याचे त्यांना ज्ञान आहे. पण ते सध्या नैराश्यात आहेत, कारण त्यांचे काही नेते आता तुरुंगात जाणार आहेत. ते कोण आहेत हे तुम्हालाही माहिती आहे! म्हणून पवार अशी टीका करतात, असं नारायण राणे म्हणाले. ते जनआशीर्वाद यात्रेच्या पत्रपरिषदेत बोलत होते.
केंद्र सरकारच्या घटनादुरुस्ती विधेयकावर मी कधीही टीका केली नाही. विरोधकांनी घटनेचा अभ्यास करावा, असंही नारायण राणेंनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
अपयशी नेत्याला उत्तर देणे म्हणजे…; अमोल मिटकरींचा पलटवार
हिंदुत्व सोडून शिवसेनेनं महाराष्ट्रात सत्ता मिळवली; चंद्रकांत पाटलांची टीका
“गोपीचंद पडळकरांनी करून दाखविलं, आता प्रशासनानंही करून दाखविलं, पडळकरांसह 41 जणांवर गुन्हे दाखल”