Home महाराष्ट्र “शरद पवार आमच्यापेक्षा मोठे, त्यात काही वादच नाही”

“शरद पवार आमच्यापेक्षा मोठे, त्यात काही वादच नाही”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी पिंपरी-चिंचवडमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना खोचक टोला लगावला होता. पंकजा मुंडे यांनीही पवारांच्या या वक्तव्यावर पलटवार केला आहे.

मी पवारसाहेबांचे वक्तव्य ऐकले नाही. पण त्यांचे बरोबर आहे. मी मोठी नेता नाही, लहानच नेता आहे. पण मोठ्या नेत्यांनी लहान नेत्यांविषयी बोलायला हवं, त्यांना प्रोत्साहन द्यायला हवं, त्यांना शिकवलं पाहिजे, असं मला शिकवलं आहे. पण त्यांच्या बोलण्यानं मी लहान होत नाही आणि मोठीही होत नाही. ते आमच्यापेक्षा मोठेच आहेत, त्यात काही वादच नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

हे ही वाचा : भाजपचे अनेक नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात असून भाजपला मोठे खिंडार पडणार ; शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचा दावा

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत रविवारी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी पंकजा सकाळी मुंबई विमानतळावरून दिल्लीला रवाना झाल्या. त्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशीही संवाद साधला. त्यावेळी त्या बोलत होत्या.

दरम्यान, पत्रकारांनी पंकजा मुंडेंबाबत प्रतिक्रिया विचारली असता, त्या एवढ्या मोठ्या नेत्या नसल्याचं शरद पवार यांनी म्हटलं होतं.

महत्वाच्या घडामोडी –

“मनसेत पक्षप्रवेशाचा धुमधडाका, कोल्हापुरात अनेक तरूणांचा मनसेत प्रवेश”

उद्या सांगलीत भव्य पक्षप्रवेशाचा सोहळा; शेकडो कार्यकर्ते करणार राष्ट्रवाीदत प्रवेश

चंद्रकांत पाटलांकडून शरद पवारांचा एकेरी उल्लेख; राष्ट्रवादीकडून जोरदार प्रत्युत्तर