रत्नागिरी : राज्यपाल भगतसिहं कोश्यारी यांनी राज ठाकरे यांना शरद पवार यांच्या भेटीचा सल्ला दिला. यावर शरद पवार यांच्याकडे हर मर्ज की दवा है, शरद पवार कुठल्याही गोष्टीवर मार्ग काढू शकतात, अशी प्रतिक्रिया महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना बहुतेक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे जाण्याची अडचण वाटत असेल. म्हणून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना शरद पवार यांना भेटण्याचा मार्ग दाखवला असेल, असं अब्दुल सत्तार म्हणाले.
“शरद पवार यांच्याकडे हर मर्ज की दवा है. शरद पवार कुठल्याही गोष्टीवर मार्ग काढू शकतात. शरद पवार शेवटच्या टोकापर्यंतचे प्रश्न सोडवतात. राजकारणातल्या प्रदीर्घ अनुभवामुळे राज्यपालांनी राज यांना पवारांच्या भेटीचा सल्ला दिला असेल, असंही अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, राज्यपालांशी वाढीव वीजबिलासंदर्भात चर्चा केली. राज्यपालांशी बोलल्यानंतर ते बोलले पवार साहेबांशी बोलून घ्या, मुख्यमंत्र्यांशी बोलून घ्या, पवारांना मी फोन करणार आहे” असं राज ठाकरे यांनी काल राज्यपालांशी भेटीनंतर माध्यमांना सांगितलं होतं.
महत्वाच्या घडामोडी-
OBC समाजाने रस्त्यावर भीक मागत फिरायचं का?, विजय वडेट्टीवारांचा सवाल
ठाकरे सरकार म्हणजे बोलीचा भात आणि बोलाची कडी… नुस्तं बोलबच्चन- निलेश राणे
…मग महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे दुःख वेगळे आहे का?; विश्वजित कदम यांचा केंद्र सरकारला सवाल
Pub-G आजपासून पूर्णपणे बंद; मोबाईलमध्ये गेम चालणार नाही