शब्दच्छल करणाऱ्यांना शरद पवारांनी गारद केलेय, त्यामुळे…; छगन भुजबळांचं फडणवीसांना उत्तर

0
194

पुणे : महाविकास आघाडीचे जनक आणि राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शरद पवार यांची सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खिल्ली उडवली आहे. याला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.

पवारांच्या मुलाखतीची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. बाकी शब्दच्छल करणाऱ्या सगळ्यांनाच शरद पवारांनी गारद केले आहे. त्यामुळे ‘एक शरद, सगळे गारद’ हे शीर्षक समर्पकच आहे, असं भुजबळ म्हणत छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

दरम्यान, संजय राऊत यांची मुलाखत घेऊन ‘एक नारद, शिवसेना गारद’ असे शीर्षक द्यावं, असे मेसेज आपल्याकडे आल्याचंही फडणवीस यांनी  म्हटलं होतं.

महत्वाच्या घडामोडी-

सारथीच्या बैठकीत मराठा समाज समन्वयकांचा गोंधळ; संभाजीराजेंना मंचाखाली बसवल्याने वाद

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय

उद्धवजी पण गारद का?; फडणवीसांचा शरद पवारांच्या मुलाखतीवरुन टोला

ठाकरे सरकारचे आपण रिमोट कंट्रोल आहात की हेडमास्तर?; संजय राऊतांचा शरद पवारांना सवाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here