मुंबई : शरद पवार बसलेच होते 5 वर्षे उपाशी असल्यासारखे, असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
शिवसेनेचं हे ठरलं होत की, काहीही करून मुख्यमंत्री बनवायचा. कितीही जागा कमी आल्या तरी पहिला मुख्यमंत्री त्यांचाच असेल हे ठरलं होतं., मिळालं तर भाजपाकडून. नाही मिळालं तर दुसरं कुणीतरी. दुसरं कोण तर शरद पवार. ते बसलेच होते पाच वर्षे उपाशी बसल्यासारखं, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, शरद पवारांवर पीएचडी करण्याचं काम चालू असताना आता अजितदादांवर पीएचडी करावीशी वाटू लागली आहे. कारण तुमचं सरकार असतानाही उपमुख्यमंत्री, त्यांचं सरकार असतानाही उपमुख्यमंत्री…सिंचन घोटाळा केला तरी काही नाही, शेतकऱ्यांना वाईट बोललं तरी काही नाही. कधी चिडून राजीनामा देतात. पण इतकं सगळं केल्यानंतरही ते मध्यवर्ती आहेत, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
देवेंद्र फडणवीस यांच्याप्रमाणे उद्धव ठाकरेंकडे अजेंडा आणि व्हिजन नाही- चंद्रकांत पाटील
अजित पवारांवर पीएचडी करण्याची माझी इच्छा आहे- चंद्रकांत पाटील
राज्य सरकारच्या आदेशाचा चंद्रकांत पाटलांना विसर
नवी मुंबई महापालिकेची निवडणूक पुढे ढकलण्याची जितेंद्र आव्हाडांची मागणी