मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची आज बैठक बोलावली होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या मंत्र्यांना मोलाचा सल्ला दिला आहे. सरकार पाच वर्ष टिकवायचं आहे, मुख्यमंत्र्यांशी योग्य समन्वय ठेवा. वादग्रस्त वक्तव्यं टाळा, असा सल्ला शरद पवार यांनी मंत्र्यांना दिला आहे.
सरकार कोणताही निर्णय घेत असेल तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी समन्वय ठेवा. सरकारने घेतलेल्या निर्णयावर वादग्रस्त वक्तव्य करू नका. ज्या मुद्दयाने वाद उफाळून येईल असे मुद्देही टाळा, अश्या सूचना शरद पवार यांनी दिल्या आहेत.
दरम्यान, या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, अनिल देशमुख, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, नवाब मलिक, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक नेते उपस्थित होते.
महत्वाच्या घडामोडी-
इथल्या कट्टर शिवसैनिकांना विचारा, नाव बदलायचं की विकास करायचा; इम्तियाज जलील
“मासिक पाळी नाही हे सिद्ध करण्यासाठी विद्यार्थींनीची तपासणी करणं दुदैवी”
मासिक पाळी नसल्याचे सिद्ध करण्यासाठी 68 विद्यार्थिनींना काढायला लावले अंतर्वस्त्त्रे
..तर शरद पवार यांच्यावर पीएचडी करण्याचा विचार करावा- रुपाली चाकणकर