आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या नगर पंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस नंबर वनचा पक्ष ठरला. या निवडणूकीत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली.
कर्जत नगर पंचायत निवडणुकीत आमदार रोहित पवारांनी भाजप नेते राम शिंदे यांना पराभवाचा धक्का दिला. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी रोहित पवार यांच्यावर राज्य पातळीवरील एक मोठी जबाबदारी दिली आहे. रोहित पवार यांनी ट्वीट करुन याबाबत माहिती दिली आहे.
हे ही वाचा : “बाळासाहेबांचे विश्वासू सहकारी, कट्टर शिवसैनिक सुधीर जोशी यांचं निधन”
आदरणीय शरद पवार साहेब यांच्या सूचनेनुसार प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब यांनी भूम-परांडा, उस्मानाबाद, करमाळा, श्रीगोंदा व पंढरपूर या पाच विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी माझ्यावर सोपवलीय. पक्षादेशानुसार आगामी काळात या मतदारसंघात संघटन वाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असं रोहित पवार म्हणाले.
या मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नवे-जुने पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या सहकार्याने कामाच्या माध्यमातून लोकांचा विश्वास संपादन केला जाईल आणि या विश्वासाच्या बळावरच आगामी सर्व निवडणुकीत या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकेल, असा विश्वास आहे, असं ट्वीट रोहित पवार यांनी केलं आहे.
या मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नवे-जुने पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या सहकार्याने कामाच्या माध्यमातून लोकांचा विश्वास संपादन केला जाईल आणि या विश्वासाच्या बळावरच आगामी सर्व निवडणुकीत या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकेल, असा विश्वास आहे.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 17, 2022
महत्वाच्या घडामोडी –
गळाभेट आणि बिर्याणी खाल्ल्यानं संबंध सुधारत नाहीत; मनमोहन सिंग यांचा मोदींना टोला
हिंगोली नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला, नगराध्यक्ष पदी शिवसेनेच्या ज्योती देशमुख यांची वर्णी
आशिष शेलारांनी घेतली राज ठाकरेंची भेट, भाजप-मनसे युतीवरून पुन्हा चर्चांना उधाण