Home महाराष्ट्र “शरद पवार एकवेळ कोरोनाबाबत निगेटीव्ह राहतील पण धनगर आरक्षणाबाबत पॉझिटिव्ह आहेत”

“शरद पवार एकवेळ कोरोनाबाबत निगेटीव्ह राहतील पण धनगर आरक्षणाबाबत पॉझिटिव्ह आहेत”

धुळे : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार एकवेळ कोरोनाबाबत निगेटीव्ह राहतील पण धनगर आरक्षणाबाबत पॉझिटिव्ह आहेत., असं वक्तव्य धनगर समाज महासभेचे अध्यक्ष अण्णा डांगे यांनी केलं आहे. धुळे येथे सुरू असलेल्या 2 दिवसीय धनगर समाज महासभेच्या अधिवेशनात ते बोलत होते.

धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत पुढील दिशा 3 डिसेंबरला ठरणार आहे. तसेच शरद पवार एकवेळ कोरोनाबाबत निगेटीव्ह राहतील पण धनगर आरक्षणाबाबत पॉझिटिव्ह आहेत., असंही अण्णा डांगे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकार धनगर समाजाला न्याय देईल, असं अण्णा डांगे म्हणाले. तसेच धनगर आरक्षणाबाबत माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी फसवणूक केल्याचा आरोपही अण्णा डांगे यांनी केला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“MDH मसालेचे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन”

…त्यामुळे आता ठाकरे सरकारला हिंदू शब्दाचेही वावडे वाटू लागले आहे- अतुल भातखळकर

बॉलिवूड यूपीला नेण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही- रामदास आठवले

“बॉलिवूडवाले मुंबईसारखी स्वप्ननगरी सोडून यूपीत जाऊन काय डाकू बनणार का?”