देवेंद्र फडणवीसांना ‘मी’ पणाचा दर्प नडला- शरद पवार

0
193

मुंबई : देवेंद्र फडणवीसांच्या कारभारावर दिल्लीतील अनेक नेते नाराज आहेत. ‘मी’ पणाचा दर्प देवेंद्र फडणवीसांना नडला.असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.

फडणवीस यांच्यावर राज्यातील अनेक नेते नाराज आहेत. मी दिल्लीत अनेक नेत्यांशी भेटलो त्यांच्याशी चर्चा केली. यातून मला एक गोष्ट कळाली की दिल्लीतील अनेक नेतेदेखील फडणवीसांवर नाराज आहेत, असं शरद पवार म्हणाले आहेत.

फडणवीस यांच्या अलीकडच्या भाषणात सत्तेचा दर्प अधिक होता. ‘शरद पवार हे इतिहासजमा झालेलं नाव आहे. आता मीच आहे. मी म्हणजे सगळं. बाकी सगळे तुच्छ अशी भूमिका मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला. महाराष्ट्रातील लोकांना हे आवडत नाही. लोकांना ‘मी’पणा आवडत नाही. विनम्रता आवडते, असंही शरद पवार यांनी म्हटलं .

मी पुन्हा येईन…’ या घोषणेत मला काही वावगं वाटत नाही. तुम्हाला लोकांचा पाठिंबा असेल तर तुम्ही त्याचा उपयोग संघटनेसाठी करून घेणं अजिबात चुकीचं नाही. मात्र, त्यात दर्प असता कामा नये. असंही शरद पवार म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

अजित पवार भाजप मध्ये जाण्याचं ‘हे’ होतं कारण.. शरद पवारांनी केला…

“बलात्काऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा देऊ”

भारतीय संंघाचा खेळाडू मनीष पांडे विवाहबंधनात

टी 20 विश्वचषक स्पर्धेत धोनी खेळणार का? याप्रश्नावर सौरव गांगुली म्हणाला…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here