आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
सांगली : थोर विचारवंत, शांतिनिकेतनचे संस्थापक संचालक स्व. डॉ. पी. बी. पाटील यांच्या विचारधारेतून सुरू असणाऱ्या शांतिनिकेतनमधील विविध उपक्रम “समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आदर्शवंत आहे. राज्यभरात अशा उपक्रमांची अंमलबजावणी करण्याची गरज आहे. “या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल. शालेय शिक्षणाला नवीन दिशा देणारा आहे. असे प्रयोगशील उपक्रम राज्यभर राबवणार असल्याचे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दादासो भुसे यांनी केले.
शालेय शिक्षण विभागाच्या वतीने “गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण पद्धती” या विषयावर मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी मंत्री भुसे बोलत होते.शालेय शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार, उपसचिव तुषार महाजन, संचालक संपत गायकवाड, उपसंचालक महेश चोथे, शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आदी प्रमुख उपस्थित होते.
राज्यभरातील संस्था प्रतिनिधी व मंत्री महोदय यांची पहिल्यांदाच चर्चासत्राच्या निमित्ताने अनेक मागण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या शारीरिक मानसिक व भावनिक विकासासाठी शिक्षक भरती व कला, क्रीडा शिक्षकांची भरती तातडीने होणे आवश्यक असल्याचे संस्था प्रतिनिधींनी मंत्री महोदयांना जाणवून दिले. यावेळी मंत्री दादा भुसे यांनी सकारात्मकता व्यक्त करत भरतीसाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे यावेळी स्पष्ट केले.
ही बातमी पण वाचा : नॅशनल लेवल अबॅकस स्पर्धेत सांगलीचा बोलबाला; सांगलीच्याब्रेन बूस्टर अकॅडमीचा 100 टक्के निकाल
या चर्चा सत्रात नवभारत शिक्षण मंडळ शांतिनिकेतनचे प्रतिनिधी डी. एस. माने यांनी अप्रगत विद्यार्थ्यांसाठी राबवलेल्या प्रगत संकल्पना, वक्तृत्व शैलीसाठीचे “बोलका” उपक्रम, समृद्ध खेळ, सांस्कृतिक कार्यशाळा, गायन-वादन आणि मातीकाम यांसारख्या संस्थेकडून वर्षभर राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती सादर केली. यावेळी शिक्षण मंत्री दादासो भुसे यांनी विविध उपक्रमांची दखल घेत कौतुक केले.
वरील क्षेत्रातील उपक्रम हे शांतिनिकेतनमध्ये गेल्या वीस वर्षांपासून सुरू आहेत. याची प्रत्यक्ष दखल विभागीय शिक्षण उपसंचालक, क्रीडा संचालक यांनी घेत तसा अहवाल शासनास सादर केला आहे.
दरम्यान, नवभारत शिक्षण मंडळ, सांगलीचे संचालक मा. श्री गौतम भाऊ पाटील यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. “नवभारत शिक्षण मंडळ, शांतिनिकेतनच्या उपक्रमांना राज्यभर मान्यता मिळणे, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. आमचे उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरत आहेत, याचा आनंद आहे. राज्य सरकारच्या सहकार्याने या उपक्रमांचा व्यापक प्रसार होईल, याची खात्री आहे. समाजाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत., असं गौतम भाऊ म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या –
धनंजय मुंडे राजीनामा देणार का?; धनंजय मुंडेंनी स्वतः केला खुलासा, म्हणाले…
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या क्रीडामहोत्सवाचे उद्घाटन
“वंदे भारत चक्क रस्ता चुकली, जायचं होतं गोव्याला, पोहचली कल्याणला”