‘करावे तसे भरावे’ म्हणत शालिनी ताई पाटील यांचं पवारांवर टिकास्त्र

0
772

सांगली : दिवंगत मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनी ताई पाटील यांनी‘करावे तसे भरावे’ अशा शब्दात  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर तोफ डागली आहे.

अजित पवारांनी भाजपसोबत जाणं हा पवारांसाठी धडा होता, 1978 ला पवारांनी जे केलं तो विश्वासघात आणि पाठिंत खंजीर खुपसण्यासारखं होतं, असं म्हणत शालिनी ताई पाटील शरद पवार यांच्यावर टिकास्त्र सोडलं.

1978 रोजी महाराष्ट्रात काँग्रेस एस या पक्षाला 69 आणि काँग्रेस आय या पक्षाला 65 जागांवर विजय मिळाला होता. तर जनता पक्षाला 99 जागांवर विजय मिळाला होता.

दरम्यान, काँग्रेसच्या दोन्ही गटांनी एकत्र येऊन सत्ता स्थपान केली होती. पण शरद पवार यांनी 38 आमदार फोडून जनता पक्षाला समर्थन दिलं. आणि मुख्यमंत्री पद मिळवलं होतं. यावेळी पवारांमुळे वसंतदादा पाटील यांना धक्का बसला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here