“उपाय देतो” म्हणत फसवलं… चुटकी बाबाचा २५० महिलांचा व्हॉट्सअप ग्रुप, अघोरी पूजेतून सेक्स रॅकेटचा खेळ..!

0
71

कोल्हापूर | प्रतिनिधी

कोल्हापूरमध्ये स्वतःला “चुटकी बाबा” म्हणून ओळखणाऱ्या सनी रमेश भोसले या भोंदू तांत्रिकाचा प्रचंड मोठा घोटाळा उघड झाला आहे. अंधश्रद्धा, वशीकरण, तंत्रमंत्र, भूतबाधा उतरवणे, स्त्रियांच्या कमकुवत मानसिकतेचा फायदा घेणे आणि याचसोबत २५० हून अधिक महिलांचा गुप्त व्हॉट्सअप ग्रुप तयार करून सेक्स रॅकेट चालवणे, या सर्वांचा संगम असलेला धक्कादायक प्रकार आता प्रकाशात आला आहे. कोल्हापूर पोलिस आणि गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास वेगात करत आहेत.

२५० महिलांचा गुप्त ग्रुप आणि सेक्स रॅकेटचे धक्कादायक धागेदोरे

पोलीस तपासात उघड झाल्याप्रमाणे, सनी भोसलेने महिलांसाठी ‘उपाय’, ‘करणी काढणे’, ‘वशीकरण’, अशा नावाखाली एक खास व्हॉट्सअप ग्रुप चालवला होता.या ग्रुपमध्ये २५० पेक्षा जास्त महिला असल्याचे समोर आले आहे.

या ग्रुपमध्ये तो

महिलांच्या समस्यांना “तांत्रिक समाधान” देतो,
नंतर त्यांना जवळ घेतो,मानसिकपणे अवलंबून बनवतो,आणि त्यानंतर सेक्स रॅकेटमध्ये ढकलतो,असा धक्कादायक आरोप अनेक महिलांनी केला आहे.

या ग्रुपचा वापर करून तो संपन्न महिला, तरुणी आणि विवाहित महिलांना टार्गेट करून त्यांच्याकडून पैसे, भावनिक नियंत्रण आणि लैंगिक शोषण करत असल्याचा आरोप समोर आला आहे.

अघोरी विधी, कवट्या, काळे तंत्र – व्हायरल व्हिडिओंनी वाढवली भीती

सनी भोसलेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

त्यात तो—चुटकी वाजवून “भूत काढतो”,काळ्या खोलीत तांत्रिक विधी करतो,प्राण्यांच्या कवट्यांचा वापर करतो,आणि महिलांना “सुप्तशक्ती जागृत करण्याचे” प्रलोभन देतो असे दृश्य आढळते.

छाप्यावेळी पोलिसांना-: गर्भनिरोधक साधने,कवट्या,काळ्या बाहुल्या,तांत्रिक सामग्री,आढळल्याची पुष्टी सूत्रांनी केली आहे.

भावनिक आणि आर्थिक फसवणूक—महिलांचे आयुष्य उद्ध्वस्तअनेक महिलांनी दिलेल्या निवेदनानुसार, चुटकी बाबा नातेसंबंधातील अडचणी,कौटुंबिक कलह,प्रेमभंग,गर्भधारणा समस्या,आर्थिक त्रास या समस्यांवर चुटकीसरशी उपाय देतो असे सांगून त्यांना जाळ्यात ओढत असे.

नंतर तोच महिलांना “तुझ्यावर काळी करणी आहे”,“तुझ्या नवऱ्याला वशीकरण केलं आहे”,तुला माझ्या स्पर्शाची आवश्यकता आहे”,असे भयभीत करणारे दावे करत त्यांच्यावर नियंत्रण मिळवत असे.

पोलीस तपासाअंतर्गत मोठे घोटाळे-: करवीर पोलिसांनी त्याच्या कोल्हापूरतील ठिकाणांवर छापे टाकले.त्यातून मिळालेल्या माहितीमध्ये—

गुप्त ग्रुप,महिला संपर्क,आर्थिक व्यवहार,मोबाईल चॅट्स,व्हिडीओ क्लिप्स,तपासासाठी जप्त करण्यात आल्या आहेत.

सध्या पोलीस मानसिक शोषण + तांत्रिक भ्रम + लैंगिक व्यापार + आर्थिक फसवणूक या सर्व बाबींचा संयुक्त तपास करत आहेत.

समाजात भीती, संताप आणि धक्का

या प्रकरणाने कोल्हापूर हादरले आहे.अंधश्रद्धा निर्मूलन समिती, महिला अधिकार संघटना व नागरिकांकडून कठोर कारवाईची मागणी होत आहे.

समाजातील शिक्षित, प्रतिष्ठित महिलादेखील या जाळ्यात अडकल्या असल्याने याचे गंभीर सामाजिक परिणाम दिसून येत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here