नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री माधवसिंह सोलंकी यांचं निधन झालं. ते 94 वर्षांचे होते.
माधवसिंह सोलंकी 4 वेळा गुजरातचे मुख्यमंत्री राहिले होते. 3 वर्षांपूर्वी शेवटच्या वेळी ते स्वत: च्या वाढदिवशी सार्वजनिक ठिकाणी दिसले होते. पत्रकार आणि व्यवसायाने वकील असलेले माधवसिंह सोलंकी यांनी राज्यातील पटेलांचे राजकीय वर्चस्व संपवलं होतं.
दरम्यान, 1980च्या निवडणुकीत जेव्हा कॉंग्रेसने बहुमताने विजय मिळविला तेव्हा त्यांनी सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या घटकांसाठी आरक्षण लागू केलं होतं.
महत्वाच्या घडामोडी-
“…त्यामुळे सर्व महापालिकेवर भाजपचाच महापौर होणार”
“…तर हे सरकारच केंद्रामध्ये उचलून ठेवा”
“भंडारा घटनेवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सरकारकडे केली ‘ही’ महत्त्वाची मागणी”
“अशोक चव्हाण यांचं मराठा आरक्षणासंदर्भातील वक्तव्य हे अज्ञान आहे”