Home महाराष्ट्र जय-पराजय विसरून ग्रामविकासासाठी एकत्र या-अजित पवार

जय-पराजय विसरून ग्रामविकासासाठी एकत्र या-अजित पवार

मुंबई : आता मिळालेल्या संधीचं सोनं करा, जय-पराजय विसरून ग्रामविकासासाठी एकत्र या, असं अजित पवार यांनी म्हणत राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत विजय मिळवणाऱ्या सर्वांचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केलं आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था लोकशाहीचा पाया भक्कम करणारी आणि महात्मा गांधीजींचे ग्रामविकासाचे स्वप्न सत्यात आणणारी यंत्रणा आहे. या यंत्रणेतील ग्रामपंचायत हा महत्वाचा घटक आहे. या ग्रामविकासाच्या प्रक्रियेत काम करण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे, असं अजित पवारांनी म्हटलं आहे.

दरम्यान, गावाचा विकास करण्यासाठी लोकांनी तुमच्यावर विश्वास दाखवला आहे. त्यामुळे तुमची जबाबदारी आता आणखी वाढली आहे, असंही अजित पवार म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

…त्यानंतर शिवसेनेला अक्कल आली पाहिजे होती; पश्चिम बंगाल निवडणुकीवरुन फडणवीसांचा टोला

भाजप सहा हजारापेक्षा जास्त जागांवर विजयी होईल- चंद्रकांत पाटील

सांगली जिल्ह्यात काँग्रेस अव्वल; 49 जागा काँग्रेसच्या खिशात

भाजपच एक नंबरचा पक्ष; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया