Home महाराष्ट्र उद्धव ठाकरेंचा साधेपणा आणि नम्रपणा पाहून भारावला बिहारचा आमदार; ऑडिओ क्लिप व्हायरल

उद्धव ठाकरेंचा साधेपणा आणि नम्रपणा पाहून भारावला बिहारचा आमदार; ऑडिओ क्लिप व्हायरल

मुंबई : सध्या लॉकडाउन असल्याने देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये अनेक लोक अडकले आहेत. महाराष्ट्रातही इतर राज्यांमधील अनेक मजूर अडकले आहेत. यामध्ये बिहारमधील मजुरांचाही समावेश आहे. यासाठी बिहारमधील आरजेडीचे आमदार सरोज यादव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करुन मदतीची मागणी केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांना मदतीचं आश्वासन दिलं. त्यांच्यामधील संभाषणाची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सर नमस्कार, मी बिहारमधून आरजेडीचा आमदार बोलत आहे. माझ्या शहरातील काही कामगार तुमच्या येथे दोन-तीन ठिकाणी अडकले आहेत. त्यांच्याकडे अन्नासाठी पैसेही नाहीत,” असं सरोज यादव म्हणाले. यावर उद्धव ठाकरे त्यांनी आपण चिंता करु नका असं सांगत अडकलेल्या कामगारांचा पत्ता आणि संपर्क क्रमांक लिहून घेतला. जेणेकरुन त्यांच्यापर्यंत पोहोचता येईल. महाराष्ट्रात आही 87 हजार लोकांसाठी व्यवस्था केली आहे. तुम्ही काळजी करु नका, आम्ही योग्य ती व्यवस्था करु, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असतानाही प्रोटोकॉल मोडून कोणतीही पूर्वसूचना नसताना एका आमदाराशी चर्चा केल्याबद्दल आभारी आहे. आज जिथे आमच्या राज्यातील मुख्यमंत्री वारंवार विनंती करुनही बोलण्यास नकार देत असताना उद्धव ठाकरे यांनी मात्र आमच्याशी चर्चा केली, अशी भावना सरोज यादव यांनी व्यक्त केली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“एकही रुग्ण तपासणी आणि उपचाराविना रुग्णालयातून परत जाता कामा नये”

… तर आता मुख्यमंत्री आमदार होणार म्हणून अभिनंदन करायची वेळ आली- निलेश राणे

मागच्या दारानं सरकार स्थापन करण्यात भाजपला कसलाही रस नाही- देवंद्र फडणवीस

तो गेलाय आणि मी उध्वस्त झालोय…,अमिताभ बच्चन यांच भावूक ट्विट