संजय राऊतांचं वक्तव्य पाहून असं वाटतं की, त्या सगळ्या बाटल्या त्यांनीच रिकाम्या केल्या- निलेश राणे

0
308

मुंबई : मंत्रालयातील उपाहारगृह परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्यांचा खच आढळून आला आहे. यावरुन विरोधकांनी ठाकरे सरकारला घेरलं आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.

महाराष्ट्राच्या मंत्रालयाला तुम्ही कशाला बदनाम करताय? मंत्रालयात काही तरी बाटल्या सापडल्याचं भाजपचं म्हणणं आहे. त्याचा आम्हाला दिल्लीतून वास येत नाही तेवढा, असा टोला संजय राऊतांनी लगावला. तसेच वर्षभर तर मंत्रालय बंदच होतं. आता हळूहळू सुरू झालं आहे. माणसं जात आहेत. आता या कोणत्या काळातील बाटल्या पडल्यात हे तपासण्यासाठी भाजपने त्या लॅबमध्ये पाठवाव्यात. किती जुन्या आहेत याचा शोध घ्यावा, असं संजय राऊतांनी म्हटलं. यावर भाजप नेते निलेश राणेंनी प्रतिक्रिया दिली.

याचा अर्थ ठाकरे सरकार आल्यापासून मंत्रालयाची आतून साफसफाई दीड वर्षांनी झाली नाही की काय?? संज्या राऊतचं हे वक्तव्य बघून असं वाटतं त्या सगळ्या बाटल्या संज्यानेच रिकाम्या केल्या आणि नशेत मीडियासमोर आला कारण रिकाम्या बाटल्या तपासायचं लॅब असतं हे आज कळलं., असा टोला निलेश राणेंनी संजय राऊतांना यावेळी लगावला.

महत्वाच्या घडामोडी –

“आरक्षण तर भाजपच देईल म्हणणाऱ्या रावसाहेब दानवेंचं तोंड बंद का?”

राज, उद्धव यांचं नका सांगू, माझा मुलगा नगरपालिकेच्या शाळेत शिकतो- बच्चू कडू

“हर्षवर्धन पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घेतली भेट, चर्चांना उधाण”

“दारूच्या त्या बाटल्या आमच्या काळातील नसाव्यात, भाजपने त्या बाटल्या लॅबमध्ये पाठवाव्यात”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here