Home महाराष्ट्र लाज नावाची गोष्ट शिल्लक राहिलीये का पाहा; निलेश राणेंची अजित पवारांवर टीका

लाज नावाची गोष्ट शिल्लक राहिलीये का पाहा; निलेश राणेंची अजित पवारांवर टीका

मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत भाजपाला मोठा फटका बसला. नागपूर, पुणे, औरंगाबाद या भाजपाच्या प्रतिष्ठेच्या पदवीधर मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय मिळवला. यावर प्रतिक्रिया देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजवर टीका केली होती. यावरून आता भाजपा नेते निलेश राणे यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे.

“वाह अजित दादा वाह!! एका वर्षापूर्वी ज्यांना चपराक बसली म्हणताय त्यांच्या बरोबर उपमुख्यमंत्रीपदाची शपथ तुम्ही घेतली हे विसरलात?? कुठेतरी अंतःकरणात लाज नावाची गोष्ट असते, बघा काही शिल्लक राहिली आहे का?, असं म्हणत निलेश राणेंनी अजित पवारावर टीका केली आहे.

दरम्यान, नागपूर आणि पुण्यात बऱ्याच वर्षांपासून पदवीधर मतदारसंघांमध्ये एका पक्षाची मत्तेदारी होती. मात्र सुशिक्षित वर्ग देखील महाविकास आघाडीच्या पाठीशी आहे. पदवीधर, शिक्षक मतदार आमच्या पाठीशी आहेत हे सिद्ध झालं. बरेच जण वाचाळ बडबड करत होते. मी त्यांची नावं घेऊन कारण नसताना वेळ घालवू इच्छित नाही. मात्र हा निकाल म्हणजे त्या वाचाळविरांना ही फार जबरदस्त चपराक बसलेली आहे, असं अजित पवार म्हणाले होते.

महत्वाच्या घडामोडी-

मुंबई महानगरपालिकेवर देखील भाजपचा झेंडा फडकवणार- राम कदम

“इतरांना इकडेतिकडे पाठवण्याची भाषा करणाऱ्या चंद्रकांत पाटलांवर त्यांचाच डाव उलटला”

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत लोकांनी भाजपचा माज उतरवला- हसन मुश्रीफ

आता महाविकास आघाडीचं सरकार सांगून पाडणार नाही, थेट कृती करणार- प्रवीण दरेकर