आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : कोरोनाच्या नवा विषाणू ओम्रिकाॅननं संपूर्ण देशात दहशत निर्माण केली आहे. दक्षिण आफ्रिकेत सर्वप्रथम हा नवा व्हेरिएंट आढळून आला. तसेच महाराष्ट्रातही आता हा विषाणू वेगाने पसरत आहे. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या शाळा, काॅलेजस आता पुन्हा बंद होणार का?, असा सवाल उपस्थित होत आहे. यावरून आता पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली.
हे ही वाचा : “कणकवलीत शिवसैनिकांचा नितेश राणेंविरोधात आक्रमक मोर्चा; बाबा मला वाचव, काॅक, काॅक… अशा दिल्या घोषणा”
सध्या नाताळ निमित्त शाळा महाविद्यालयांना सुट्ट्या आहेत. परंतु पुढील काळात शाळा , महाविद्यालये सुरू ठेवायचे की नाही? याचा निर्णय परिस्थिती पाहून घेतला जाईल.’, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
दरम्यान, काही मुलांनी 2 वर्षात शाळा पाहिलेलीच नाही अशी स्थिती आहे, याबद्दल निश्चितच दुःख आहे, पण आरोग्य ही आपली प्राथमिक गरज असल्यानं काही निर्णय घ्यावे लागतात, असंही आदित्य ठाकरेंनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
…त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू शकते; चंद्रकांत पाटलांचा राज्य सरकारला इशारा
नितेश राणेंवर कारवाई करा, अन्यथा…; शिवसेनेचा इशारा
आता वडेट्टीवारांनी शिवरायांचा अपमान केला?; भाजपचा आरोप