साहित्य संमेलन गीतात सावरकरांचा उल्लेख नाही, संयोजकांनी चूक सुधारावी; मनसेची मागणी

0
447

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नाशिक : नाशिकमध्ये 3 ते 5 डिसेंबर मराठी साहित्य संमेलन होणार आहे. साहित्य संमेलन गीतात स्वातंत्र्यवीर सावरकरांचा उल्लेख नाही, यावरून वाद सुरू झाला आहे. अशातच संमेलनाच्या संयोजकांनी ही चूक सुधारावी, अशी मागणी मनसेचे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी केली आहे. पक्षाच्या शहर कार्यालयात पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत या विषयावर चर्चा करण्यात आली.

हे ही वाचा : “राष्ट्रवादीचा भाजपला दे धक्का; ‘हा’ माजी आमदार असंख्य समर्थकांसह राष्ट्रवादीत”

नाशिकला होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या संमेलन गीतात सावरकरांचा उल्लेख हवा होता. तसेच, संमेलनाच्या कामकाज, विषय पत्रिका व उपक्रमांत कुठेही स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा उल्लेख नाही. त्यांच्या साहित्याची दखल घेतली गेली पाहिजे होती. सावरकर हे नाशिकचे भूमिपुत्र आहेत,  त्यांचा अनुल्लेख योग्य नाही. त्यामुळे कार्यकर्ते नाराज आहेत. यासाठी आम्ही आयोजकांचा निषेध करतो. यासंदर्भात लवकरच संमेलनाचे स्वागताध्यक्ष व पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देऊ. संमेलनाच्या संयोजकांनी चूक केली आहे ती दुरुस्त करा, साहित्य संमेलनाच्या स्थळाला सावरकरांचे नाव द्या. नाशिकच्या स्थानिक लोकांची भावना समजून घ्या, अशी मागणी करू, असं दिलीप दातीर म्हणाले आहेत.

दरम्यान, साहित्य संमेलन मुंबई एज्युकेशन ट्रस्टच्या भुजबळ नॉलेज सिटी शैक्षणिक कॅम्पसमध्ये होणार आहे. त्याला यापूर्वीच ‘कविश्रेष्ठ कुसुमाग्रज नगरी’ नाव देण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे मनसेच्या या मागणीबाबत काय तोडगा काढला जातो, याची उत्सुकता आहे.

महत्वाच्या घडामोडी –

अनेक शिवसैनिकांच्या संसाराच्या होळ्या करून शिवसेना उभी राहिलीये- प्रवीण दरेकर

“परभणीत राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग; काँग्रेसच्या 10 नगरसेवकांनी हाती बांधलं घड्याळ”

“राज ठाकरे एसटी कर्मचाऱ्यांसोबत; मात्र आत्महत्या न करण्याची ठेवली अट”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here