Home महाराष्ट्र सरकार म्हणून जे आपल्या हिताचे आहे तेच करणार, तुम्ही अजिबात काळजी करू...

सरकार म्हणून जे आपल्या हिताचे आहे तेच करणार, तुम्ही अजिबात काळजी करू नका; मुख्यमंत्र्यांचा भिलवडीत पूरग्रस्तांशी संवाद

सांगली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगली दौऱ्यावर आहेत. ते आज नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत .

सकाळी 11 वाजलेपासून उद्धव ठाकरे अंकलखोप, भिलवडी, मौजे डिग्रज, कसबे डिग्रज आणि सांगली येथे पूर परिस्थितीची पाहणी करत आहेत. उद्धव ठाकरेंनी भिलवडीत पोहचल्यानंतर बाजारपेठेत पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधला.

असं काही झाले की लगेच पॅकेज जाहीर केले जाते. मग त्यातला पैसा कुठे जातो ते कळत नाही. मला प्रामाणिकपणे आपल्यासाठी काम करायचे आहे., असं उद्धव ठाकरे म्हणाले.

घर- दार, शेती यांचे किती नुकसान झाले याची आकडेवारी घेतली जात आहे. आम्ही कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. सरकार म्हणून जे आपल्या हिताचे आहे तेच करणार. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आपल्या सूचनांचा नक्की विचार करू., असं आश्वासन उद्धव ठाकरेंनी यावेळी दिलं.

महत्वाच्या घडामोडी –

राज्यात अनेक संकटे आली, पण उद्धव ठाकरेंनी हिंमत दाखवली; शरद पवारांकडून मुख्यमंत्र्यांचं काैतुक

संजय राऊत, तुम्हाला सेना भवनच्या आत नेवून फटके टाकणार; निलेश राणेंचा हल्लाबोल

“शिक्षणमहर्षी व मराठवाड्याचे साने गुरूजी अशी ओळख असलेले आलुरे गुरूजी यांचं निधन”

देवेंद्र फडणवीस हे स्वत: मुख्यमंत्री होते. त्यामुळे…; विजय वडेट्टीवारांचा टोला