मुंबई : पीएमसी बँक गैरव्यवहार प्रकरणी शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावले होते. त्यावर वर्षा राऊत यांनी ईडीकडे वेळ वाढवून मागितला होता. 5 जानेवारी रोजी वर्षा राऊत चौकशीसाठी जाणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, आजच वर्षा राऊत ईडी कार्यालयात हजर झाल्या.
सोमवारी (४ जानेवारी) वर्षा राऊत ईडी कार्यालयात दाखल झाल्या. त्यांची तीन तास चौकशी केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, वर्षा राऊत ईडी कार्यालयात दाखल होताना शिवसेनेकडू शक्ती प्रदर्शन केलं जाणार असल्याची चर्चा होती. ती गर्दी व गोंधळ टाळण्यासाठीच वर्षा राऊत एक दिवस आधीच चौकशीसाठी हजर झाल्याचं बोललं जात आहे.
महत्वाच्या घडामोडी-
‘त्यांना चपलेने मारायचं’; जुना व्हिडिओ पोस्ट करत नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंना टोला
सत्ता पणाला लावायची की नाही, हे शिवसेनेनं ठरवावं- चंद्रकांत पाटील
“शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश”
शिवसेनेचा भगवा हिरवा झाला आहे का?; नामांतरावरून किरीट सोमय्यांचा हल्लाबोल