Home महाराष्ट्र “तौते वादळामुळे झालेल्या नुकसानीबाबत संजय राऊतांचा अभ्यास कमी पडला”

“तौते वादळामुळे झालेल्या नुकसानीबाबत संजय राऊतांचा अभ्यास कमी पडला”

मुंबई : तौते वादळामुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात राऊतांची केंद्राकडून अपेक्षा पाहता त्यांचा अभ्यास कमी पडला असं दिसत आहे, अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे.

राज्य सरकारचा अहवाल म्हणजे कोकणवासियांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे. या चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीच्या अहवालावरुन राज्य सरकारला काही द्यायचंच नाही असं दिसून येत आहे. त्यांनी आपल्या व्हिडिओमध्ये ह्या अहवालातली नुकसानाची आकडेवारी जाहीर केली आहे.

“कोकण विभागीय आयुक्तांकडून तौते वादळामुळे झालेल्या नुकसानीचा तपशील राज्य सरकारकडे पाठवण्यात आलेला आहे.“ज्यामध्ये मनुष्यहानीकरता 41 लाख, पशुधन नुकसान सहा लाख 29 हजार, घरगुती वस्तू, कपड्यांसाठी 11 लाख 29 हजार, पक्क्या-कच्च्या घरांच्या पडझडीसाठी 25 कोटी 24 लाख, जनावरांच्या गोठ्यांसाठी 34 लाख 84 हजार, मत्स्य व्यावसायिकांसाठी 44 कोटी, शेती व बहुवार्षिक पिकांसाठी 16 कोटी 48 लाख अशा प्रकारे एकूण 47 कोटी 15 लाखाची मागणी संपूर्ण कोकणसाठी म्हणजे मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग ही मागणी झाली आहे, असं प्रवीण दरेकर म्हणाले आहेत.

दरम्यान, “संजय राऊतांनी दोन हजार कोटींची अपेक्षा केंद्राकडून केली आहे. म्हणजे प्रथमदर्शनी संजय राऊतांना दोन हजार कोटींचं नुकसान झालं आहे असं वाटलं असावं. म्हणजे एक तर संजय राऊतांचा अभ्यास कमी किंवा शासनाची मानसिकता कोकणवासीयांना देण्याची नाही. कारण दोन हजार कोटींच्या 2.35 टक्के एवढेही पैसे होत नाहीत. नुकसान कोट्यावधीचं झालेलं आहे. त्यामुळे 40-45 कोटी म्हणजे कोकणवासीयांच्या तोंडाला पानं पुसणारा हा अहवाल शासनाकडून आलेला दिसत आहे, असंही प्रवीण दरेकरांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“महाविकास आघाडी सरकारच्या निष्काळजीपणामुळे दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात”

चंद्रकांत पाटल्यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर सचिन सावंताची टीका; म्हणाले…

राजीनामा देऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न मिटणार असेल तर मी आताच खासदारकीचा राजीनामा देईन- संभाजीराजे

“पंतप्रधान मोदींना वाटतं मराठा आरक्षण हा राज्याचा विषय, म्हणून ते संभाजीराजेंना भेटले नाहीत”