मुंबई : तीन महिन्यांत महाराष्ट्रातील सरकार पडणार, असं वक्तव्य भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलं होतं. याला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
महाराष्ट्रातील सरकारचं 2024 नंतर बघू. तोपर्यंत भाजपने विरोधी पक्षाची भूमिका भक्कमपणे पार पाडावी. सरकार एवढ्या दिवसांत किंवा महिन्यात पडेल, ही धमकी देणं बंद करावं. नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनात भाजपने विरोधी पक्ष म्हणून उत्तम काम केलं. खरं खोटं नंतर बघू, पण पुढची साडेतीन वर्ष विरोधी पक्ष म्हणून असंच काम करत राहा, असं संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, कोणत्याही सिनेमात नायकासोबत तितकाच खंदा खलनायकही लागतो. त्यांच्यामुळेही सिनेमा जोरात चालतो. महाविकासआघाडीच्या सिनेमात देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार त्यांची पात्रं उत्तमपणे वठवत आहेत, असा टोलाही संजय राऊत यांनी यावेळी लगावलाय.
महत्वाच्या घडामोडी –
खतरनाक! श्रीलंकन खेळाडूचा किरोन पोलार्डने घेतला लाजवाब कॅच; पहा व्हिडिओ
आता विष पिणार नाही तर पाजणार; मराठा आरक्षणावरून उदयनराजे संतापले
“…नाहीतर तुझं करिअर बरबाद करेन, अशी धमकी देत प्रशिक्षकानंच केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार”
आयपीएल सुरू होण्याआधी RCB ला मोठा धक्का! ‘या’ स्टार खेळाडूनं घेतली माघार