देवेंद्र फडणवीसांनी आदित्य ठाकरेंवर केलेल्या टीकेला संजय राऊतांच प्रत्युत्तर; म्हणाले…

0
143

मुंबई : रोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना ‘नया है वह’ असं म्हणत टोला लगावला होता. यालाच शिवसेना नेते संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय. नरेंद्र मोदी-अमित शहा हे दिल्लीत, तर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रात नवेच आहेत, असं म्हणत संजय राऊत यांनी पलटवार केला  आहे. ते ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते.

देवेंद्र फडणवीसही नवेच आहेत, ते जुने कुठे झाले आहेत. तरुणांना संधी द्यावी, या मताचे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदीही आहेत. अमित शाहसुद्धा दिल्लीच्या राजकारणात नवीनच आहेत. मात्र त्यांनी गृहमंत्री म्हणून दिल्लीत उत्तम काम केलं आहे, मोदीही दिल्लीत नवे होते, त्यांनी उत्तम काम केलं, आम्ही कौतुक करतोच की. त्यांना आम्ही नया है वह म्हटलं का? आदित्य ठाकरे हे मंत्री म्हणून चांगलं काम करत आहेत,असं संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, मंत्री बनवल्याने शहाणपण येतंच, असं नाही. त्यामुळे ठीक आहे, ते नवीन आहेत, बोलत आहेत. मला असं वाटतं, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.

महत्वाच्या घडामोडी-

“महाराष्ट्रात दिलदार मुख्यमंत्री; फडणवीसांना सत्ता गेल्याचं सहन होईना”

“हा घ्या; संघाच्या स्वयंसेवकांनी धारावीत काम केल्याचा पुरावा’”

चंद्रकांत पाटलांनी माफी मागावी; अन्यथा…; हसन मुश्रीफांचा चंद्रकांत पाटलांना इशारा

मंत्री झाल्याने शहाणपण येत नाही; देवेंद्र फडणवीसांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here