मुंबई : पालिकेच्या शाळेतील एका कार्यक्रमात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बोलताना शिक्षणाच्या मुद्द्यावरून केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांच्यावर टीका केली होती.
संजयजी राऊत काल मा.स्मृती ईराणी बद्दल जे बरळलात…मुळात आधी तुमच्या चमचेगिरीचा आणि सामनाच्या संपादक पदाचा काय संबंध आहे??ते सांगा मग मी तुम्हाला त्यांचा आणि त्यांना मिळालेल्या मंत्रीपदाचा काय संबध आहे याबाबत नक्की खुलासा देईन… आपणास एक स्पष्ट सांगायची आहे की, संजय राऊतजी भाषणात महिलांची तुलना करताना भान ठेवा. अन्यथा आम्हा महिलांनाही आमचा सन्मान राखण्यासाठी आरेला कारे करण्याची भाषा वापरता येते, असा इशारा चित्रा वाघ यांनी यावेळी दिला.
संजयजी राऊत काल मा. @smritiirani बद्दल जे बरळलात…
मुळात आधी तुमच्या चमचेगिरीचा आणि सामनाच्या संपादक पदाचा काय संबंध आहे??
ते सांगा
मग मी तुम्हाला त्यांचा आणि त्यांना मिळालेल्या मंत्रीपदाचा काय संबध आहे याबाबत नक्की खुलासा देईन… @rautsanjay61 @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis pic.twitter.com/zvGvofjChi— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) July 9, 2021
दरम्यान, संजय राऊत यांनी बोलताना, शिक्षणाचा कसा खेळखंडोबा आहे बघा. या देशाला नवे शिक्षण मंत्री मिळाले. त्यांचं नाव धर्मेंद्र प्रधान. चांगले आहेत ते. काल पर्यंत ते पेट्रोल विकत होते. पेट्रोलियम मंत्री होते ते. त्यांच्या आधी रमेश पोखराल नावाचे शिक्षण मंत्री होते. ते शाळेतच कधी गेले नव्हते. पण ते शिक्षण मंत्री होते. आता त्यांना कळलं की, त्यांना काही येत नाही. त्या आधी स्मृती ईराणी. मॉडेलिंग करायची. म्हणजे शिक्षणाचा काहीही संबंध नसलेले लोकांना आपलं शिक्षण खातं सांभाळायचं आहे. म्हणून तो चित्रपट आला होता. शिक्षणाचा आयचा घो. बरोबर आहे ते, अशी टीका संजय राऊतांनी केली होती.
महत्वाच्या घडामोडी –
“राफेल चौकशीची आग लागली फ्रान्समध्ये आणि धूर निघाला दिल्लीत, कुछ तो गडबड है…
खडसे प्रकरणात मी काय बोलणार, मी ईडीचा प्रवक्ता नाही; फडणवीसांचं मोठं वक्तव्य
“राणेंना केंद्रीय गृहमंत्री केलं तरी शिवसेनेला फरक पडत नाही”
“सरकारचं अपयश झाकण्यासाठी केंद्रातील मंत्रीच नाही, तर पंतप्रधान मोदींनाही बदलण्याची गरज”