मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत हे तब्यतीच्या कारणास्तव लीलावती रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांना आज लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.
संजय राऊत यांच्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये दोन ब्लॉकेज होते. त्यामुळे त्यांच्यावर अँज्युओप्लॅस्टीची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
डिस्चार्ज मिळाल्यानंतर मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार अशी पहिली प्रतिक्रीया संजय राऊत यांनी दिली आहे.
दरम्यान, काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, जेष्ठ काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे आणि विश्वजीत कदम यांनी आज संजय राऊत यांची लीलावती रुग्णालयात जाऊन भेट घेतली आहे.