आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना संजय राऊत यांनी केंद्रीय तपास यंत्रणा (ईडीच्या) सूरू असलेल्या कारवाईवरून केंद्र सरकारवर आरोप केले आहेत.
शिवसेना नेते आणि त्यांच्या नातेवाईकांना केंद्रीय संस्थांकडून टार्गेट केलं जात आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन सरकार पाडायचं काम केलं जात आहे, असा गंभीर आरोप संजय राऊतांनी यावेळी केला. ही मुंबई आहे आणि मुंबईचा दादा शिवसेना आहे. आम्ही भाजपच्या नेत्यांच्या मागे लागलो तर नागपूरला पण जाता येणार नाही., हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही माहिती आहे, असा टोला संजय राऊतांनी यावेळी लगावला. तसेच ईडीचा नकाब उतरवल्याशिवाय राहणार नाही. मुंबईत दादागिरी चालणार नाही, असा इशारा संजय राऊतांनी यावेळी दिला. यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली.
हे ही वाचा : “अमरावतीचे पालिका आयुक्त डॉ.प्रवीण आष्टीकर यांच्यावर रवी राणा समर्थकांनी फेकली शाई”
संजय राऊत यांचे वक्तव्य मुंबईचा दादा “ शिवसेना ” पण ती फक्त “मातोश्रीपुरतीच ”. गुन्हे करायचे आणि मी नाही त्यातला असे म्हणायचे ही वेळ संजय राऊत यांच्यावर आली आहे. धमक्या देण्याचे दिवस संजय राऊत आता संपले आहेत, असं राणे म्हणाले.
तुमची जागा बाहेर नाही आता “आत” तेव्हा संजय राऊत धमक्या देणे बंद करा कोणी भीक नाही घालत तुमच्या धमक्यांना आणि भाजपवाले तर नाहीच नाही, असा हल्लाबोल नारायण राणेंनी यावेळी केला.
तुमची जागा बाहेर नाही आता “आत” तेव्हा संजय राऊत धमक्या देणे बंद करा कोणी भीक नाही घालत तुमच्या धमक्यांना आणि भाजपवाले तर नाहीच नाही.
— Narayan Rane (@MeNarayanRane) February 9, 2022
महत्वाच्या घडामोडी –
संजय राऊत म्हणाले, मुंबईचा दादा शिवसेनाच; आता देवेंद्र फडणवीस, म्हणतात…
कर्नाटक सरकारचा हिजाबला परवानगी देण्यास नकार; तर ओवेसी म्हणतात…
…तरी राज्यातलं सरकार आमच्या ताब्यातच राहणार; नवाब मलिकांचा फडणवीसांना टोला