मुंबई : भाजपच्या कार्यालयासमोर काय आहे, याचा आम्हाला काय फरक पडतो? कोणतं भवन चवन असेल तर काय फरक पडतो? ते बाळासाहेबांचं शिवसेना भवन राहिलं नाही. ते कलेक्शन ऑफिस झालं आहे, अशी टीका भाजप नेते नितेश राणेंनी केली होती. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून प्रतिक्रिया दिली.
महाराष्ट्रात तातडीने नशा मुक्ती कार्यक्रम हाती घेणे गरजेचे आहे. नाहीतर राजकीय गांजाडयांना मराठी माणूस शिवसेना भवनाच्या फुटपाथवरबेदम चोपलयाशिवाय राहणार नाही.( समझनेवालोंको इशारा काफी है..) शिवसेना भवन हे मराठी अस्मितेचे ज्वलंत प्रतीक आहे. बाटगयांना हे कसे समजणार?,, असं प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिलं. यावर भाजप नेते निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली.
हे काय ऐकतोय मी की संज्या धमकी द्यायला लागलाय, संज्या तू फटाके खाणारच आहेस पण खास तुझ्यासाठी तुला सेनाभवनच्या आत नेहून फटके टाकणार. काय दिवस आलेत शिवसेनेचे संपादक धमक्या देतोय आणि काँग्रेस सोडून शिवसेनेत गेलेले सदा सरवणकर सेनाभवनची रखवाली करतायत., असा घणाघात निलेश राणेंनी यावेळी केला.
हे काय ऐकतोय मी की संज्या धमकी द्यायला लागलाय, संज्या तू फटाके खाणारच आहेस पण खास तुझ्यासाठी तुला सेनाभवनच्या आत नेहून फटके टाकणार. काय दिवस आलेत शिवसेनेचे संपादक धमक्या देतोय आणि काँग्रेस सोडून शिवसेनेत गेलेले सदा सरवणकर सेनाभवनची रखवाली करतायत.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) August 2, 2021
महत्वाच्या घडामोडी –
“शिक्षणमहर्षी व मराठवाड्याचे साने गुरूजी अशी ओळख असलेले आलुरे गुरूजी यांचं निधन”
देवेंद्र फडणवीस हे स्वत: मुख्यमंत्री होते. त्यामुळे…; विजय वडेट्टीवारांचा टोला
“शरद पवारांमुळेच मी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली”
“उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यापासून पनवती लागली”