शपथविधी होता का…दशक्रियाविधी? एवढ्या सकाळी सकाळी आटोपला-संजय राऊत

0
180

मुंबई : महाराष्ट्राला नव्हे तर देशाला धक्का देणारी घटना एका रात्रीत घडली आहे. आज सकाळी अनपेक्षितपणे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यावर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी ट्वीट केलं आहे.

शपथविधी होता का…दशक्रियाविधी? एवढ्या सकाळी सकाळी आटोपला, असं म्हणत संजय राऊत यांनी टोला लगावला आहे.

महाराष्ट्राच्या मन की बात pic.twitter.com/vq8rXIipv1

— Sanjay Raut (@rautsanjay61) November 23, 2019

महाराष्ट्राच्या जनतेला नजर भिडवून, दिवसाढवळ्या शपथ का घेतली नाही याचा अर्थ तुम्ही पाप केलंय. रात्रीच्या अंधारात पाप होतं. चोरुन डाका घातला जातो, असं म्हणत संजय राऊत यांनी अजित पवारांवर टीका केली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवारांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजिर खुपसला आहेत. त्यांनी शरद पवारांना या वयात दगा दिला आहे, असंही शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटंल आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here