Home महाराष्ट्र संजय राऊत यांनी मानले केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाचे आभार

संजय राऊत यांनी मानले केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाचे आभार

मुंबई : राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण होण्याची भीती असतानाच निवडणूक आयोगाने दिलासा देत विधानपरिषदेच्या रिक्त 9 जागांसाठी निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे. यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयाचं स्वागत केलंय.

महाराष्ट्रातील रखडलेल्या विधान परिषद निवडणूका घेण्यास परवानगी दिली आहे. या मुळे राज्यात निर्माण झालेले राजकीय अनिश्चिततेचया वातावरणाचा धुरळा खाली बसेल. महाराष्ट्राची पुण्याई मोठी. महणून महाराष्ट्र दिनादिवशी हा निर्णय आला.केन्द्र सरकारचे आभार, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, ही वेळ एकमेकांना समजून घेण्याची आहे. आज एक नवा अध्याय सुरु होत आहे. महाराष्ट्राचं सरकार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातच पाच वर्ष राहणार आहे. मग कशाला राजकीय खेळ करायचे. निवडणूक आयोगाने राज्याच्या हिताचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र दिनाच्या दिवशी महाराष्ट्रासाठी हा शिवसंकेत आणि शुभनिर्णय आहे, असंही राऊत म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

उद्धव ठाकरेंचा साधेपणा आणि नम्रपणा पाहून भारावला बिहारचा आमदार; ऑडिओ क्लिप व्हायरल

“एकही रुग्ण तपासणी आणि उपचाराविना रुग्णालयातून परत जाता कामा नये”

… तर आता मुख्यमंत्री आमदार होणार म्हणून अभिनंदन करायची वेळ आली- निलेश राणे

मागच्या दारानं सरकार स्थापन करण्यात भाजपला कसलाही रस नाही- देवंद्र फडणवीस