मुंबई : भाजपने 26 जून रोजी ओबीसी आरक्षण पूर्ववत करावं यासाठी चक्का जाम आंदोलन केलं होतं. नागपुरात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन पार पडलं. यावेळी बोलताना त्यांनी, “आमच्या हातात पुन्हा सूत्रं दिली तर ओबीसींना पुन्हा आरक्षण मिळवून देईन, नाहीतर मी राजकारणातून संन्यास घेईन,” असं वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी केलं होतं. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं.
देवेंद्र फडणवीस हे लढवय्ये नेते आहेत. त्यांचं राजकीय भविष्य उज्ज्वल आहे. त्यांना संन्यासाची भाषा शोभत नाही. ते फकीर होण्याची भाषा करत असतील तर मी स्वत: त्यांची भेट घेईन, असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. यावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांची चिंता करण्यापेक्षा शिवसेनेची चिंता करावी! कारण त्यांच्या राष्ट्रवादीची चिंता करण्याच्या धोरणामुळे शिवसेनेत नाराजी आणि अस्वस्थता आहे., असं ट्विट करत प्रवीण दरेकर यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिलं आहे.
संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांची चिंता करण्यापेक्षा शिवसेनेची चिंता करावी!
कारण त्यांच्या राष्ट्रवादीची चिंता करण्याच्या धोरणामुळे शिवसेनेत नाराजी आणि अस्वस्थता आहे. pic.twitter.com/k0Jwpy4Ipq— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) June 28, 2021
महत्वाच्या घडामोडी –
नक्कीच हा वाघ सर्कशीतीलच असला पाहिजे; वडेट्टीवारांच्या वक्तव्यावरून नारायण राणेंचा शिवसेनेला टोला
“देवेंद्र फडणवीस यांची नौटंकी महाराष्ट्राला समजलीये, त्यामुळे जनताच आता फडणवीसांना संन्यास देईल”
पवार कुटुंबाला सगळं फुकट पाहिजे; बालेवाडीतील कार पार्किंगवरून निलेश राणेंचा हल्लाबोल
लेकीनंही बापाने केलेल्या कामाची जाण ठेवली पाहिजे; गुलाबराव पाटलांचं रक्षा खडसेंना प्रत्युत्तर