आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : माजी केंद्रीय मंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अनंत गिते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातील राजकारणात मोठी खळबळ माजली. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शरद पवार हे देशाचे नेते असल्याचं म्हणत या विषयावर अधिक बोलणं टाळलं. मात्र, यावरुन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे.
‘मला तर सुरुवातीला आनंद हा झाला. संजय राऊत वारंवार सांगत होते की शरद पवार यांनी कुणाच्या पाठीत खंजीर खुपसल्याचं उदाहरण मिळाल्यास मी राजकारण सोडेन. आता त्यांना सोडावचं लागेल, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यानंतर लगेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची एक क्लिप समोर आली होती. त्यात तर त्यांनी माझ्यापेक्षा जास्त टीका केली होती. आता अनंतर गिते यांनीही तेच सांगितलं आहे. त्यामुळे मला आनंद आहे की मला जे जाणवतं ते समाजातील अनेकांना जाणवत आहे. कुणी बोलण्याचं धाडस दाखवतो तर कुणी बोलत नाही. अनंत गिते यांनी धाडस दाखवून बोलले. शिस्तबद्ध शिवसेनेतील अनेकांची भावना हीच आहे. पण ते बोलत नाहीत’, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
पालकमंत्री उदय सामंत हे कोकणातील शक्ती कपूर; नितेश राणेंची टीका
भाजपला मोठा दिलासा; 12 निलंबित आमदारांबाबत निवडणूक आयोगाचा ‘हा’ मोठा निर्णय
शिवसेनेचं काहीही झालं तरी चालेल पण सरकार पाच वर्ष टिकलं पाहिजे, हा तर…; दरेकरांचा टोला
“दुधा तुपाच्या गुळण्या करणाऱ्या भाजप नेत्यांची मस्ती जनता लवकरच उतरवेल”