संजय राऊत यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी- प्रवीण दरेकर

0
660

मुंबई : कांजूरमार्ग मेट्रो कारशेडबाबत कोर्टाने दिलेल्या निर्णयावर संजय राऊत यांनी टीका केली होती. कोर्टाचा हा निर्णय दुर्देवी असल्याचं संजय राऊत म्हणाले होते. यावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी प्रतिक्रिया देत संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.

प्रविण दरेकर यांनी संजय राऊतांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. संजय राऊत यांची वक्तव्यं बेताल तसंच बेजबाबदार आहेत. आज त्यांनी सरळ न्यायालयाने काय केलं पाहिजे हे ते सांगितलं. त्यामुळे राऊतांवर कायदेशीर कारवाई व्हायला हवी., असं दरेकर म्हणाले.

दरम्यान, कोर्टावर अशा पद्धतीचं भाष्य करणं हा कोर्टाचा अवमान आहे. सर्वोच्च न्यायव्यवस्था असताना त्यांच्यावरच अशा प्रकारचे आरोप करणं चूक आहे. यासाठीच संजय राऊत यांच्यावक कारवाई करावी अशी ही मागणी आहे, असंही दरेकर यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

जगातील सुंदर महिलांपैकी एक असलेल्या मिस वर्ल्ड मानुषीचा BOLD अंदाज

आम्ही तुमच्यासारख्या खोट्या कोरोना चाचण्या करत नाही; अरविंद केजरीवालांचा योगींना टोला

“नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जादूटोणा करण्याचा प्रयत्न”

तुमचं डोकं फुटेल, पण 1 आमदार फुटणार नाही; सुधीर मुनगुंटीवारांचे जयंत पाटलांना प्रत्युत्तर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here