मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचं पानीपत झाल्यानंतर भाजप नेत्यांकडून शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडलं जात आहे. यावर भाजप नेते व माजी खासदार निलेश राणे यांनी प्रतिक्रिया देत शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
बिहारच्या मुख्यमंत्रिपदावर शिवसेनेला बोलायचा अधिकार काय? त्यांनी कधी निवडणूक लढवली नाही. संजय राऊत यांची किंमत काय आहे समाजामध्ये? संजय राऊत एकदा तरी समाजातून निवडून आले आहेत का? संजय राऊत यांनी एका नगरपरिषदेच्या निवडणुकीत निवडून येऊन दाखवू देत. संजय राऊत आणि निवडणूक यांचा काही संबंध नाही., असं म्हणत निलेश राणेंनी संजय राऊतांवर हल्लाबोल केला आहे.
दरम्यान, बिहार निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील चित्र बदलायलाही वेळ लागणार नाही. कारण महाविकास आघाडीबाबत असंतोष आहे. महाराष्ट्रात होणाऱ्या आगामी निवडणुकीमध्ये हे चित्र दिसेल., असंही निलेश राणे यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
महाराष्ट्रातसुद्धा जनतेच्या घड्याळ्याच्या ‘टायमिंग’चं काय सांगावं- आशिष शेलार
“बिहारमध्ये नितीश कुमार यांचा घात झाला, भाजप मित्रपक्षांना संपवतो हे पुन्हा सिद्ध झालं”
वारंवार देशात स्वतःचा कचरा केल्याबद्दल शिवसेनेचं परत एकदा अभिनंदन; निलेश राणेंचा टोला
वारंवार देशात स्वतःचा कचरा केल्याबद्दल शिवसेनेचं परत एकदा अभिनंदन; निलेश राणेंचा टोला