संजय राऊत शिवसेनेचे की राष्ट्रवादीचे प्रवक्ते?; प्रवीण दरेकरांचा सवाल

0
164

मुंबई : शिवसेनेसाठी खस्ता खाणाऱ्या आणि बंजारा समाज पक्षाच्या पाठिशी उभा करणाऱ्या संजय राठोड यांचा बचाव करण्यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत कधीही पुढे आले नाहीत. मात्र, आता ते गृहमंत्री अनिल देशमुख यांचे भक्कम समर्थन करुन राष्ट्रवादी काँग्रेसची चाकरी इमानाने करत आहेत. त्यामुळे संजय राऊत हे नक्की शिवसेना की राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत, असा उपरोधक सवाल भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला.

संजय राऊत यांचं वक्तव्य पाहता राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना प्रवक्ता केलंय की काय, अशी शंका वाटते. संजय राठोड यांचं कृत्य चुकीचंच होतं. पण त्यावेळी संजय राऊत आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्याच्या पाठिशी ठामपणे उभे राहिले नाहीत. त्यावेळी चौकशीसाठी संजय राठोड यांचा राजीनामा आवश्यक वाटला. तेव्हा चौकशीसाठी राजीनामा आवश्यक नाही, असं राऊत यांना सांगावंसं वाटलं नाही. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

दरम्यान, त्यावेळी राऊतांनी संजय राठोड यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले का, हे माहिती नाही. मात्र, आता संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याची पाठराखण इमानाने करताना दिसत आहेत, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी यावेळी केली.

महत्वाच्या घडामोडी –

…तर देवेंद्र फडणवीस यांचीही चाैकशी करा- नाना पटोले

खासदार सुप्रिया सुळेंनी घेतली सोनिया गांधींची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

“नितेश राणेंचा कणकवलीत पराभव करून शिवसेना काय चीज आहे हे दाखवून देऊ”

देवेंद्र फडणवीस हे सह्याद्री आणि मोदींपेक्षाही मोठे नेते, पण ते मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत- संजय राऊत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here