संजय राऊत म्हणाले, मुंबईचा दादा शिवसेनाच; आता देवेंद्र फडणवीस, म्हणतात…

0
330

कर्नाटक सरकारचा हिजाबला परवानगी देण्यास नकार; तर ओवेसी म्हणतात…

पणजी : ही मुंबई आहे आणि मुंबईचा दादा शिवसेना आहे. आम्ही भाजपच्या नेत्यांच्या मागे लागलो तर नागपूरला पण जाता येणार नाही, असं वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं होतं. त्यावर महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला आहे.

हे ही वाचा :  कर्नाटक सरकारचा हिजाबला परवानगी देण्यास नकार; तर ओवेसी म्हणतात…

शेर कभी गिदड धमकी से डरा नही करते. असं म्हणत संजय राऊत रोज सकाळी येऊन मनोरंजन करत असतात. संपादक असल्याने चर्चेत राहण्यासाठी काय विधाने केली पाहिजे हे त्यांना माहीत आहे. त्यांचं काही म्हणणं असेल तर त्यांनी कोर्टात जाऊन म्हणणं मांडावं, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.

ईडी काय करते हे ईडी सांगेल. ते का करतात तेही ईडी सांगेल. संजय राऊत सध्या व्हिक्टिम कार्ड खेळण्याचा प्रयत्न करत आहेत. हे जे वक्तव्य आहे तो व्हिक्टिम कार्डचा एक भाग आहे. त्यांचं काही म्हणणं असेल तर त्यांनी न्यायालयात जाऊन मांडावं, असा सल्लाही देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

महत्वाच्या घडामोडी –

…तरी राज्यातलं सरकार आमच्या ताब्यातच राहणार; नवाब मलिकांचा फडणवीसांना टोला

“ही मुंबई आहे आणि मुंबईचा दादा फक्त शिवसेना आहे, दुसरं कोणी नाही”

काँग्रेसचं काळं कुत्रं जरी आलं तर झोडून काढू; भाजपच्या ‘या’ नेत्याचं वादग्रस्त विधान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here