संजय राऊतांनी स्वत:ची किंमत ओळखली; निलेश राणेंचा घणाघात

0
256

मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दैनिक ‘सामना’ला पत्रं पाठवून शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर आरोप केले आहेत. यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया देत चंद्रकात पाटलांवर सव्वा रूपयांचा दावा करणार असल्याचं म्हटलं. यावरून आता भाजप नेते निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली.

संज्यासारखा मूर्ख संज्याचं… आपण जेव्हा कोणावर नुकसानीचा दावा टाकतो तेव्हा आपल्या लायकी नुसार नुकसानाची किंमत ठरते. संज्याने ठरवलं त्याची स्वतःची किंमत ही सव्वा रुपये आहे. पहिल्यांदा संज्याने स्वतःची किंमत ओळखली., असा घणाघात निलेश राणेंनी यावेळी केला.

दरम्यान, इतर लोकं लावतात 100 कोटी, 50 कोटी असा दावा करणार नाही. सव्वा रुपयांचा दावा लावू. त्यांची तेवढीच ताकद आहे. सव्वा रुपयेच फक्त. त्यांच्याकडे तेवढेच आहेत. सव्वा रुपयावाले आहेत. 100 कोटींचा दावा कशाला? मला नको शंभर कोटी. ज्यांना हवा ते दावा लावतात. सव्वा रुपया ठिक आहे. ज्यांची जेवढी लायकी तेवढा दावा लावायचा असतो, असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला होता.

महत्वाच्या घडामोडी –

“पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेनेला मोठा धक्का, असंख्य शिवसैनिकांचा भाजपमध्ये प्रवेश”

“IPL मध्ये पुन्हा कोरोनाची एन्ट्री, सनरायझर्स हैदराबादचा ‘हा’ स्टार गोलंदाज कोरोना पाॅझिटिव्ह”

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रविवारी दिल्ली दाैऱ्यावर, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची घेणार भेट”

चंद्रकांत पाटलांवर सव्वा रुपयांचा दावा करणार, कारण…; संजय राऊतांचा चिमटा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here