मुंबई : राज्यात सध्या करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशातच केंद्र आणि राज्य सरकारकडून करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. परंतु यावरूनच आता राजकारणाला सुरूवात झाली आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजपला गांभीर्य नसलेला पक्ष म्हटलं होतं. त्यावरून भाजपचे नेते आणि माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
ही राजकारण करण्याची वेळ नाही. विरोधी पक्षावर टीका करणारे संजय राऊत हे कोण आहेत?, ते शरद पवार यांच्या घरचे खरूजलेले कुत्रे आहेत. या परिस्थितीत केंद्रातील आणि राज्यातील सरकार सोबत आहे, अशी टिका अनिल बोंडे यांनी केली आहे.
ही राजकारण करायची वेळ नाही विरोधीपक्षावर टीका करणारे @rautsanjay61 हे कोण आहे ते @PawarSpeaks यांच्या घरचे एक खरुजलेले कुत्र आहे. ह्या परिस्थितीत @BJP4Maharashtra केंद्रात @narendramodi आणि महाराष्ट्रमध्ये राज्य सरकार सोबत आहे@Dev_Fadnavis @ChDadaPatil @CMOMaharashtra @ShivSena pic.twitter.com/E0JcEMdFNw
— Dr. Anil Bonde (EX. Agriculture Minister) (@DoctorAnilBonde) April 1, 2020
दरम्यान, गांभीर्य नसलेल्या विरोधकांच्या डोक्यावर एखादा दंडुका पडल्याशिवाय त्यांचे डोके ठिकाणावर येणार नाही, अशी टिका संजय राऊत यांनी भाजपवर केली होती.
महत्वाच्या घडामोडी-
पुढील वर्ष भराचा माझा पगार अन् CM फंडात जमा करा- जितेंद्र आव्हाड
महाराष्ट्र उध्दवजींच्या सुरक्षित हातात आहे याचा अभिमान वाटतो- जितेंद्र आव्हाड
सांगलीत घराबाहेर पडणाऱ्यांना पोलिसांचा दणका; केल्या तब्बल 350 वाहने जप्त
राज्य सरकारचा मोठा निर्णय; मुख्यमंत्र्यांसह लोकप्रतिनिधींच्या वेतनात 60 टक्के कपात